
निकिता कातकाडे
जग झपाट्यानं बदलतंय आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत फर्निचरचं जगही नव्या वाटा शोधू लागलंय. केवळ सजावटीपुरतं मर्यादित न राहता, आता फर्निचर आपल्या जीवनशैलीचा आरसा ठरत आहे.
शाश्वतता, स्मार्ट तंत्रज्ञान, जागेचा प्रभावी वापर, सौंदर्य आणि उपयुक्ततेचा सुंदर मिलाफ सध्याच्या फर्निचरमध्ये दिसून येतो. पर्यावरणपूरक साहित्यांपासून ते एआयआधारित स्मार्ट बेड्सपर्यंत, घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला समर्पक आणि स्टायलिश स्पर्श देणारे हे ट्रेंड्स तुमचं घर अधिक ‘जिवंत’, आरामदायक आणि कार्यक्षम करतील. घर सजवण्याचे हे काही लेटेस्ट फर्निचर ट्रेंड्स...