

Wave Energy India
esakal
किरण बर्वे, गणिताचे अभ्यासक व संशोधक
ऊर्जा निर्मितीमुळे प्रदूषण होणार नाही आणि स्रोत सतत उपलब्ध असेल, तर असा ऊर्जास्रोत उत्तम. ‘हरित’, ‘नवीकरणीय’ विषयीचे संशोधन महत्त्वाचे ठरते. पवनऊर्जा, सौरऊर्जा, असे स्रोत आहेत. अजून एका प्रकारची हरित, शाश्वत ऊर्जा विपुल प्रमाणात भारताच्या अवतीभवती आहे, ती म्हणजे सागरी लाटा.
वा ढते प्रदूषण आणि इंधनाची कमतरता यामुळे आज जगभरात सौर आणि पवनऊर्जेसारख्या पर्यायांचा विचार होत आहे. विविध युद्धांमुळे निर्माण होणारी खनिज तेलटंचाई आपण अनुभवतच आहोत. अशा वेळेला एकाच प्रकारच्या ऊर्जास्रोतावरील अवलंबित्व कमी करण्याची आवश्यकता तीव्रतेने जाणवते. अशा वेळी एका महत्त्वाच्या स्त्रोताकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि तो म्हणजे आपल्या विशाल समुद्रकिनाऱ्यावर अहोरात्र आदळणाऱ्या लाटांमध्ये दडलेला ऊर्जेचा, तरंगऊर्जेचा एक प्रचंड साठा.