
सतलजमुळे पंजाब प्रांत समृद्ध झालेला आहे, याचे कारण पंजाबला भरपूर पाणी आणि वीज प्राप्त झाली आहे. आता सतलज नदी संपूर्ण भारताला एका दुर्मीळ आणि दुर्लभ मूलद्रव्याचा नजराणा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स तलज नदीचा उगम तिबेटमधील राक्षसताल सरोवरामधून होतो. हा भाग ४६०० मीटर उंचीवर आहे. ऋग्वेदात या नदीला शतद्रू म्हटलंय, याचं कारण तिला पर्वतराजींवरील वेगवेगळे १०० मुख्य प्रवाह येऊन मिळतात. हिमालयातील दऱ्या-खोऱ्यांचा खडतर प्रवास करताना सतलजमध्ये अनेक खनिजद्रव्ये विरघळतात आणि ती पुढे वाहून येतात. ही नदी पंजाबराज्यामध्ये एक मुख्य नदी म्हणून प्रविष्ट होते. सतलजमुळे पंजाब प्रांत समृद्ध झालेला आहे, याचे कारण पंजाबला भरपूर पाणी आणि वीज प्राप्त झाली आहे. आता सतलज नदी संपूर्ण भारताला एका दूर्मिळ आणि दुर्लभ मूलद्रव्याचा नजराणा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.