
मिलिंद मुरुगकर, आर्थिक प्रश्नांवरील अभ्यासक, तज्ज्ञ
सरकारपुढील समस्या अशी आहे की, विकासकामांसाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही. त्यामुळे आयकर भरणाऱ्यांची संख्या वाढवणे हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे. ते करण्याचे सोडून वर्षाला बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना पूर्णपणे करमुक्त केले आहे आणि त्यावरच्या लोकांनादेखील करात मोठी सवलत दिली आहे.
सरकारने एक लाख कोटी रुपयांवर पाणी सोडले आहे. याचा मोठा फटका देशातील बहुसंख्य लोकांना बसणार आहे. श्रीमंत लोकांचा पैसा अनेकदा आयात वस्तू आणि सेवांचा खप वाढवतो. ही करसवलत दिल्लीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दिली गेली, अशा विश्लेषणात अर्थात मोठे तथ्य आहे. दिल्लीत करदात्यांची संख्या मोठी आहे. आणि त्याचा मोठा फायदा भाजपला मिळाला. देशातील बहुसंख्य सर्वसामान्य, गरीब जनतेला त्याचा मोठा फटका बसला. दुर्दैवाने त्यांना ते कधी कळणारही नाही.