
नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम, वाद आणि संवाद होतच असतात. पण व्यवहार बऱ्याचदा तोंडीच केले जातात. आपण वाटणी करायला बिचकतो किंवा बऱ्याचदा करतच नाही. हे तुझं, ते माझं असंही सहसा होत नाही. पण आता हेच करणं फायद्याचं ठरू शकतं बरंका! मुंबईतल्या एका घटनेमुळे नवरा-बायको मधल्या व्यवहारांची एक वेगळीच बाजू समोर आलीये.
मुंबईतल्या एका महिलेने तिच्या पतीकडून भेट मिळालेल्या घरांच्या विक्रीवर कोणताही कर भरण्यास नकार दिला!
कर अधिकाऱ्यांनी हा व्यवहार 'कर चुकवण्याचा बनावट प्रयत्न' असल्याचे म्हटलं.. महिलेने आयकर विभागाच्या या निर्णयाला आव्हान देत थेट कोर्ट गाठलं आणि मग सुरू झाला नवरा बायको, व्यवहार, न्यायाचा खेळ...
आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने, म्हणजेच आयकर विभागाच्या अपील करण्यासाठीच्या न्यायालयाने या केसचा निकाल महिलेच्या बाजूने दिलाय. आयकर कायदा काय सांगतो, त्याचा अर्थ कसा लावला जातो, कायद्याचा योग्य वापर करून तुम्ही तुमचे पैसे कसे वाचवू शकता हे सगळं या केसने दाखवून दिले आहे. कुटुंबातल्या व्यवहारांना सुद्धा योग्य कागदपत्रांचा किती आणि कसा फायदा होऊ शकतो, कर अधिकाऱ्यांनी हा व्यवहार 'कर चुकवण्याचा बनावट प्रयत्न' कशाच्या आधारे केला, एकूणातच हे प्रकरण काय आणि या निर्णयातून तुमच्या-आमच्यासारख्यांनी काय बरं शिकायचं ? हे सगळं सविस्तर वाचा 'सकाळ प्लस'च्या आजच्या लेखात...