

Professional Development for Teachers
esakal
सुदाम कुंभार - sakal.avtaran@gmail.com
शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी दरवर्षी ५० तासांचे सीपीडी प्रशिक्षण ही संकल्पना निश्चितच स्वागतार्ह आहे; मात्र नियमित अध्यापनासोबत वाढत्या प्रशासकीय, डिजिटल आणि अशैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडताना ते गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे कितपत शक्य आहे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या शिक्षक दिनानिमित्त प्रशिक्षणाची गरज आणि शिक्षकांच्या कामकाजाचे वास्तव यांचा समतोल साधणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या ६ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींनुसार, राज्यातील प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी ५० घड्याळी तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण (सीपीडी) पूर्ण करणे अपेक्षित आहे. शिक्षकांचे ज्ञान, कौशल्ये आणि अध्यापनातील गुणवत्ता सतत अद्ययावत राहावी, आधुनिक अध्यापन पद्धतींचा स्वीकार व्हावा आणि विद्यार्थिकेंद्रित शिक्षण अधिक प्रभावी व्हावे, हा या धोरणामागील मूलभूत उद्देश आहे. या दृष्टीने शासनाचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे.