Premium|Teacher Student Relationship : चित्रपटांतील संवाद मुलांच्या मनात उतरतात; पण त्यामागचा विचार पोहोचतो का?

Teacher Student Relationship : ‘थ्री इडियट्स’, ‘तारे जमीन पर’ आणि ‘छिछोरे’सारख्या चित्रपटांतील संवादांचा मुलांवर होणारा प्रभाव, बदलती शालेय संस्कृती, शिस्त, स्वातंत्र्य आणि शिक्षक-विद्यार्थी नात्याचा नव्याने विचार.
Teacher Student Relationship

Teacher Student Relationship

esakal

Updated on: 

सुदाम कुंभार - sakal.avtaran@gmail.com

चित्रपटांतील काही संवाद केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाहीत; तर ते मुलांच्या बोलण्यात, विचारांत आणि वागण्यातही उतरतात. ‘थ्री इडियट्स’, ‘तारे जमीन पर’ अन् ‘छिछोरे’सारख्या चित्रपटांमधील संवाद आजही लोकप्रिय आहेत. मात्र, ते पाठ असले तरी त्यामागचा विचार मुलांपर्यंत पोहोचतो का? बदलत्या काळात शिक्षक-विद्यार्थी नाते, शिस्त, स्वातंत्र्य आणि शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या बालदिनानिमित्ताने हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो.

‘थ्री इडियट्स’मधील ‘लाइफ इज अ रेस...’ हा संवाद विद्यार्थ्यांनी जीवनमंत्र म्हणून स्वीकारावा म्हणून आलेला नाही; उलट प्रत्येक गोष्टीत स्पर्धा निर्माण करणाऱ्या व्यवस्थेची मानसिकता तो अधोरेखित करतो. त्याच चित्रपटातील ‘ऑल इज वेल!’ हे लोकप्रिय वाक्यही मनातील भीतीला सामोरे जाण्याच्या संदर्भात येते.

करमणुकीचे प्रभावी साधन असलेला सिनेमा, बदलती शालेय संस्कृती आणि शिक्षक-विद्यार्थी संवाद इत्यादी अनुषंगाने सगळ्यांचा परस्पर संबंध लक्षात घेतला, तर एक बदल ठळकपणे जाणवतो. काल शिक्षकाच्या हातात छडी होती आणि विद्यार्थ्याच्या हातात पाटी... आज विद्यार्थ्याच्या हातात स्मार्टफोन आहे. साधने बदलली, कायदे बदलले, पालकांची भूमिका बदलली, विचार बदलले, विद्यार्थी बदलला आणि त्याचबरोबर शिक्षकाची भूमिकाही बदलली. मात्र, या बदलांच्या वेगाशी आपली शाळा आणि विशेषतः शिक्षक-विद्यार्थी नाते कितपत जुळवून घेऊ शकले आहे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

एक काळ असा होता, की ‘छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम’ ही म्हण शालेय संस्कृतीचा जणू अलिखित नियम होती. गृहपाठ न करणे, वर्गात लक्ष न देणे, उशिरा येणे किंवा अभ्यासात अपेक्षित प्रगती न करणे, यासाठी शिक्षकांनी शिक्षा करणे असामान्य मानले जात नसे. शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती होती आणि पालकही अनेकदा मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी विश्वासाने शिक्षकांवर सोपवत.

त्या काळातील प्रत्येक गोष्ट आदर्श होती, असे मात्र नाही. भीती, अपमान आणि शारीरिक शिक्षा ही शिक्षणाची साधने असू शकत नाहीत. आज शिक्षण अधिक बालककेंद्री आणि हक्काधिष्ठित झाले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १७ नुसार बालकांना शारीरिक शिक्षा किंवा मानसिक छळ करण्यास स्पष्ट मनाई आहे. हा बदल आवश्यक आणि स्वागतार्ह आहे. कारण शाळा ही भीतीची नव्हे, तर सुरक्षितता, सन्मान आणि आनंददायी शिक्षणाची जागा असली पाहिजे. इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो - शिक्षा हद्दपार झाली; पण तिच्या जागी परिणामकारक आणि सकारात्मक शिस्तीची व्यवस्था आपण निर्माण केली का?

Loading content, please wait...