
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
आयसीसी स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाची गेल्या चार सलग कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सलग चार स्पर्धांत अंतिम सामन्यात धडक मारलेल्या भारतीय संघाचे सातत्य वाखाणण्याजोगेच आहे. त्यातील दोन स्पर्धांत विजेतेपदी विराजमान होताना मारलेली अविजीत भरारी लक्षणीय आहे. अर्थात. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजयानंतर काही आजी-माजी खेळाडूंनी मुरडलेली नाके दुर्लक्ष करून सोडून देणेच बरोबर ठरेल. त्याचे कारण भारत सरकारने अत्यंत विचारपूर्वक आपला संघ पाकिस्तानला जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका व्यवस्थित स्पष्ट केली होती.