
Tejashwi Yadav statement
esakal
बिहारमध्ये महागठबंधन आघाडीचा प्रमुख चेहरा तेजस्वी प्रसाद यांना आशा वाटत आहे की वीस वर्षांच्या डबल इंजिन सरकारची सत्ता जाऊन जनतेचे सरकार सत्तेवर येईल. त्यांच्या मते विकासाच्या नावावर या सरकारने लूट आणी भ्रष्टाचार वाढवला आहे. ते असा प्रश्न करतात की बिहारचा जर एवढा विकास झाला असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकाचे दरडोई उत्पन्न सगळ्यात कमी का आहे? ते असेही मानतात की ज्या सामाजिक शक्ती लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळास जंगलराज म्हणतात त्याच जननायक कर्पूरी ठाकूर यांचा जाहीरपणे अपमान करत होत्या. प्रचारात प्रचंड व्यस्त असलेल्या महागठबंधन व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सा. सरकारनामाचे प्रतिनिधी उज्ज्वलकुमार यांना मुलाखत दिली.
यंदा खूप चांगली निवडणूक असेल. तिच्याविषयी आम्हा सर्व राजकीय पक्षांना व सर्वसामान्य लोकांनाही मोठी उत्सुकता आहे.
निवडणूक चांगली होणार असल्याची एक नव्हे तर अनेक कारणे आहेत. किती सांगू? या सरकारला सुशासन असलेले सरकार म्हटले जाते. यावर मला काहीही म्हणायचे नाही. तुम्ही राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगाचा अहवाल वाचा. तुम्हाला माहिती होईल. बिहारमध्ये या आधीच्या कोणत्याही कार्यकाळापेक्षा या सरकारच्या कार्यकाळात सर्वात जास्त हत्या झालेल्या आहेत. इतर सर्व गुन्ह्यांचाही आलेख पाहावा. जर भारत सरकारचाच अहवाल समोर असेल तर आम्ही काय बोलणार?