Premium|Plastic Recycling Business : कचऱ्याचं सोनं होताना...!

Cost Driver Analysis : प्लॅस्टिक रीसायकलिंग व्यवसायात केवळ कचरा गोळा करून ग्रॅन्युल्स बनवणे पुरेसे नाही. खर्च नेमका कशामुळे वाढतो हे समजून घेण्यासाठी कॉस्ट ड्रायव्हर ॲनालिसिस महत्त्वाचे आहे.
Plastic Recycling Business

Plastic Recycling Business

esakal

Updated on

प्रतीक डुंबरे - capsdumbre@gmail.com

तेनालीरामन- मध्ययुगीन इतिहासातील एक बुद्धिमान, मिश्कील आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व! आजच्या एकविसाव्या शतकातील एका काल्पनिक साम्राज्यातील हा तेनाली आपल्या महाराजांशी संवाद साधत व्यवसायातील काही महत्त्वाची रहस्ये उलगडतो, ‘तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क’च्या माध्यमातून कॉस्ट ड्रायव्हर ॲनालिसिसचे महत्त्व जाणून घेऊ या.

पनीच्या मोठ्या शेडमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि तुटलेल्या प्लॅस्टिकचे तुकडे ढिगाने पडलेले होते. एका बाजूला कामगार प्लॅस्टिकचे वर्गीकरण करत होते, तर दुसऱ्या बाजूला यंत्रांचा आवाज सतत घुमत होता.

महाराज ते दृश्य पाहत म्हणाले, ‘‘तेनाली, हा प्लॅस्टिक कचऱ्याचा व्यवसाय एकदम मस्त आहे. कमी वैविध्य आणि जास्त मार्जिन! कचरा गोळा करायचा, धुवायचा, मशीनमध्ये टाकायचा आणि ग्रॅन्युल्स बनवायचे... एवढेच ना?’’

तेनाली हलकासा हसला.

‘‘महाराज, एवढे सोपे असते, तर प्रत्येक जण करोडपती झाला असता. या उद्योगात खरी कला आहे ती खर्च कशामुळे वाढतो हे समजून घेण्यात. आणि त्यासाठी आपल्या ‘तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क’मधील महत्त्वाचे अस्त्र म्हणजे कॉस्ट ड्रायव्हर ॲनालिसिस. पण ते समजून घेण्याआधी आपण हा व्यवसाय नीट समजून घेऊ.’’

‘‘समजा, एक लघु किंवा मध्यम प्लॅस्टिक रीसायकलिंग युनिट दररोज १००० किलो प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करते.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com