
श्रीराम पवार
shriram1.pawar@gmail.com
उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले, तरी त्यांच्या एकत्रीकरणामागे केवळ मराठी अस्मिता नाही तर दोघांचीही राजकीय गरज महत्त्वाची ठरली आहे.
महाआघाडी आणि युतीला दोघांच्या युतीचे आव्हान आहे, मात्र उद्धव आणि राज एकत्र राहिले आणि एकत्र निवडणुका लढवल्या, तर सर्वांत अधिक फटका भाजपच्या राजकारणाला बसेल. मुंबई महानगर क्षेत्रात तो शिंदे यांच्या शिवसेनेलाही बसेल हे उघड आहे. हे एकत्रीकरण राजकीय गरजेपोटी असले, तरी सध्या त्याचा आधार मराठीचा सन्मान हा आहे.