
सीताराम कुंटे
महाराष्ट्रात महापालिका निवडणुका न झाल्याने मागील सुमारे तीन वर्षांपासून प्रशासकाच्या हातात सर्व कारभार एकवटला आहे. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत पालिकांचा कारभार चालत असताना नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत.
ही परिस्थिती का निर्माण झाली, प्रशासकाच्या हाताखाली चालणाऱ्या कारभारात काय अडचणी येत असतील, व त्यावर उपाय योजना काय करावी, या संदर्भात अनुभवातून काही मते मांडत आहे.
सर्वप्रथम, पालिका निवडणुका पुढे का ढकलल्या गेल्या? तर निवडणुका पुढे ढकलण्याकरिता सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे नगरसेवकांच्या निवडीकरिता आरक्षण व्यवस्था अंशतः रद्द करण्यात आली.