
तुम्हाला माहीत आहे का, जगाच्या नकाशावर अगदी लहानसं असलेलं अँग्विला बेट आज जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे! आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामागे कोणतं सोनं, तेल किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती नाही, तर केवळ एक डोमेन नेम आहे. ५० वर्षांपूर्वी मिळालेलं डोमेन नाव या बेटाला आज अब्जावधी रूपये मिळवून देत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बेटाला या डोमेनमुळे मिळणारा प्रचंड पैसा हा केवळ नशिबामुळे मिळत आहे. त्यात त्या बेटाचं काहीही कर्तृत्व नाही.
फक्त डोमेन नावामुळे एखाद्या बेटाला इतकं महत्त्व प्राप्त कसं होऊ शकतं? नेमकं याच बेटाच्या डोमेन नावाला इतकं महत्त्व का आलंय? या नावामुळे एका बेटाची संपूर्ण अर्थव्यवस्था कशी बदलली? या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या लेखातून.