Premium|India semiconductor mission : टीव्हीएवढ्या रेडिओपासून ते नखभर चिपपर्यंत! वाचा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील महाक्रांतीचा रंजक इतिहास

From Radio Valves to Silicon Microchips : एकेकाळच्या टीव्हीएवढ्या रेडिओपासून ते आजच्या ३४ हजार कोटी ट्रान्झिस्टर क्षमतेच्या मायक्रोचिपपर्यंत झालेली इलेक्ट्रॉनिक्स क्रांती आणि आगामी काळात चिप्सच्या तुटवड्यामुळे आधुनिक जगाचा कारभार ठप्प होण्याच्या चिंतेचा सखोल वेध.
India semiconductor mission

India semiconductor mission

esakal

Updated on

डॉ. अनिल लचके - saptrang@esakal.com

एकेकाळी रेडिओचा आकार टीव्हीएवढा होता, याचे कारण त्याच्या आत मोठे ‘व्हॉल्व्ह’ असत. व्हॉल्व्हचे कार्य करणा-या वाटाण्या एवढ्या ट्रांझिस्टरचा शोध १९४७ मध्ये लागला. साहजिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हलकी आणि छोटी झाली. नंतर इंटिग्रेटेड सर्किट आणि मायक्रोप्रोसेसरमुळे क्रांती झाली. त्याची निर्मिती करण्यासाठी शुद्ध सिलिकॉन वापरलेले होते. त्या नखभर लांबी-रुंदीच्या प्रोसेसरला लोक ‘चिप’ म्हणू लागले. किमतीच्या दृष्टीने मायक्रोप्रोसेसर ‘चीप’ होता. ई-मेल, छायाचित्रण, संगीत, चित्रपट - असं सर्व काही संगणकाला जमू लागलं. मोबाईल, सीडी, त्रिमितीयुक्त ग्राफिक्स, मल्टीमिडिया, वेब-कॅमेरा- हे शब्द आबालवृद्धही सर्रास वापरू लागले. सेमीकंडक्टर, मायक्रोचिप, मायक्रोप्रोसेसर हे शब्द जनमानसात रुळू लागले आहेत. सिलिकॉन सारख्या सेमीकंडक्टर मधून विद्युतरोधकांपेक्षा जास्त पण विद्युतवाहकापेक्षा कमी विद्युतप्रवाह वाहतो. अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किट्स एकत्र आले की मायक्रोचिप बनते. मायक्रोप्रोसेसर स्वतः जणू आपण ‘ब्रेन’ आहोत असं समजतो. आता तर काही मायक्रोप्रोसेसरवर सुमारे ३४ हजार कोटी ट्रान्झिस्टर ''बसवता'' येतात!

गेल्या २५ वर्षातील इलेक्ट्रॉंनिक्स-क्षेत्रातील गती अनुभवून जग वगेळ्या वळणावर आले आहे. आहे ती गती अजून वाढली पाहिजे, असं त्याला वाटतं. त्यासाठी दुर्मीळ मूलद्रव्यांची आणि मोठ्या प्रमाणात मायक्रोचिपच्या निर्मितीची गरज आहे. तथापि मागणीएवढा पुरवठा होत नाही. कारण मायक्रोचिपची गरज सर्वत्र आहे - उदाहरणार्थ, घडयाळं, टेलिफोन, मोबाईल, खेळणी, टीव्ही, यंत्रमानव, एटीएम - आदी. आता अनेक उपकरणे ‘मिनी’ झाली आणि बॅटरीवर कार्य करू लागली. इलेक्ट्रिक मोटार, आंतरखंडीय विमानं, लष्करी सामग्री, द्रोण, क्षेपणास्त्रे, ए आय क्लाऊड सर्व्हर्स, अंतराळ विज्ञान, पेसमेकर, हियरिंग एड, वैद्यकीय उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्ता यासाठी हजारो सेमीकंडक्टर आवश्यक असतात. साहजिकच आगामीकाळात मायक्रोचिप विना आधुनिक जगाचा कारभार ठप्प होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com