Premium|Iran Regime Change : शासनव्यवस्थेच्या बदलाचा भ्रम?

West Asia Geopolitics : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिका-इस्राईलच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, ट्रम्प यांच्या आक्रमक 'डोन्रो डॉक्ट्रिन'मुळे पश्चिम आशियात सत्ताबदलाचा मोठा जुगार खेळला जात असल्याने जागतिक राजकारणात आता भीषण अस्थिरता निर्माण झाली आहे.
West Asia Geopolitics

West Asia Geopolitics

esakal

Updated on

डॉ. मनीष दाभाडे - सहयोगी प्राध्यापक, जेएनयू

अमेरिका-इस्राईलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. मात्र, यातून इराणमधील शासनव्यवस्थेमध्ये बदल होणार का, हा खरा प्रश्न आहे. शासनव्यवस्थेतील बदल हाच अमेरिकेचा उद्देश असला, तरीही तेथील व्यवस्थेची उतरंड पाहिली, तर तत्काळ बदल होईल, असे मानता येणार नाही.

अमेरिका आणि इस्राईलने २८ फेब्रुवारीच्या रात्री संयुक्तपणे कारवाईला सुरू केली आणि इराणवर प्रचंड हल्ले सुरू केले. या हल्ल्यांमध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या मोहिमेनंतर प्रसारित केलेल्या आठ मिनिटांच्या व्हिडिओ संदेशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाच्या उन्मादात इराणच्या जनतेला सत्ता ताब्यात घेण्याचे आवाहन केले. उन्मादात बुडालेल्या स्वरात ट्रम्प म्हणाले, ‘‘आमचे काम झाल्यावर तुमचे सरकार तुम्ही स्वतः ताब्यात घ्या. ते तुमचेच असेल.’’ या एका वाक्यातून सत्ताबदल टाळण्याची पूर्वीची शपथ मोडून जॉर्ज ड्ब्लू बुश यांच्यानंतरचे सर्वांत आक्रमक हस्तक्षेपवादी अध्यक्ष म्हणून स्वतःला सिद्ध केले. हे युद्ध अपरिहार्य नव्हते; हा एक प्रकारचा निवडीचा, राजकीय गणितातून तयार झालेला धोकादायक जुगार आहे. ही गोष्ट इस्राईलच्या साथीने शक्य झाली आणि यामागील विचारसरणी विध्वंसाच्या तमाशालाच धोरण समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com