
प्रेम शुक्ला, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीनंतर येथील राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सरकारच्या कारकिर्दीतील गैरव्यवहार अन् भ्रष्टाचाराने दिल्लीवासीय त्रस्त झाले आहेत. या राजवटीला कंटाळलेल्या या जनतेने भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
यामागे अनेक कारणे आहेत. त्यामागे अरविंद केजरीवाल सरकारचे अपयश, भ्रष्टाचार, घोटाळे आणि ‘आप’ची खोटी आश्वासने ही प्रमुख कारणे आहेत. केजरीवाल आणि त्यांचा पक्ष बहुतांश आश्वासने पाळण्यात अपयशी ठरला आहे. ‘आप’ सरकारचे कुशासन अन् माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली राबविलेली चुकीची धोरणे जनतेच्या रोषामागील कारणे आहेत.