
बरेच बालसाहित्यिक आपल्या बालपणीच्या ऐवजावरच लिहीत राहतात; पण एकनाथ आव्हाड हे सतत मुलांच्या सान्निध्यात असल्यामुळे बदलत्या पिढीप्रमाणे त्यांची कथा बदलत गेलेली दिसते. मोबाईलचे उल्लेख आजच्या पिढीलाही कवेत घेतात. ‘घरभर दरवळणारा सुगंध’ हा बालकथासंग्रहही मुलांचा भवताल प्रसन्न करणारा आहे.
एकनाथ आव्हाड हे मुलांसाठी लेखन करणारे आजचे आघाडीचे लेखक आहेत. त्यांची अनेक पुस्तके बालवाचकांना आनंद देत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या कार्यासाठी त्यांना साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराबरोबरच इतरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.