
निळू दामले
पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करणं हे कँप डेव्हिडचं उद्दिष्ट होतं. या कराराला आता ४५ वर्षे झाली. करारात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या जिमी कार्टर यांचे नुकतेच निधन झाले. पॅलेस्टाईनमध्ये अजूनही शांतता प्रस्थापित झालेली नाही. या कराराचं फलित काय, याचा एकदा आढावा घेण्याची वेळ आली आहे.
कॅंप डेव्हिड करार (१९७८) ही एक ऐतिहासिक घटना आहे. त्या कराराला यंदा ४५ वर्षं पुरी झाली. योगायोग असा की त्याच वेळी तो करार घडवून आणणाऱ्या अध्यक्ष जिमी कार्टर यांचा मृत्यू झाला. हा करार केल्याबद्दल इस्राईलचे पंतप्रधान मेनाचेम बेगिन आणि इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांना १९७८ मध्ये शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं.
त्याच कारणासाठी कार्टर यांना २००२ मध्ये शांततेचं नोबेल मिळालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करणं हे कँप डेव्हिड कराराचं उद्दिष्ट होतं. पश्चिम आशियात म्हणजे मुख्यतः पॅलेस्टाईनमध्ये.