

Delhi excise policy scam CBI court verdict Arvind Kejriwal
esakal
सुनील चावके - ‘सकाळ’च्या दिल्ली ब्युरोचे प्रमुख
कोविडपश्चात देशाच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह सर्व २३ आरोपींविरुद्धचे सीबीआयचे आरोपपत्र फेटाळून लावत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर खाते आणि दिल्ली पोलिसांना जंगजंग पछाडूनही हा गैरव्यवहार सिद्ध करता आला नाही. दिल्लीचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवून देशाच्या राजकारणात भाजप आणि काँग्रेसला आम आदमी पक्षाचा (आप) पर्याय निर्माण करू पाहणारे केजरीवाल यांच्या राजकारणाला ‘संजीवनी’ तसेच राष्ट्रीय राजकारणात पुनरागमनाची संधी मिळाली आहे.