

China Tech Shock 2026
esakal
डॉ. निलेश खरे - saptrang@esakal.com
दिल्लीत झालेली ‘एआय’ परिषद भारतीय तंत्रज्ञानासाठी आशेचा किरण आहे. सरकारचे हे सकारात्मक पाऊल आहे, मात्र अशा परिषदा उत्सवी ठरू नयेत, यासाठी चिनी ‘एआय’ ड्रॅगनवरही पाळत ठेवावी लागणार आहे. चीन आता केवळ खेळणी किंवा कपडे बनवत नाहीये, तो ‘व्हॅल्यू चेन’मध्ये वर सरकत आहे. याचा अर्थ चीन आता केवळ जगाचा कारखाना राहिला नसून, जगाची प्रयोगशाळा बनतो आहे. चीनची रणनीती अत्यंत स्पष्ट आहे ः कमी खर्च + मजबूत सप्लाय चेन + प्रगत तंत्रज्ञान = जागतिक वर्चस्व. यात भारत कोठे आहे याचा हा ऊहापोह...
ची नची ही घौडदौड म्हणजे केवळ एक व्यापारी युद्ध नाही, ना दोन महासत्तांमधील किरकोळ वाद. हा एक ‘टेक शॉक’ आहे, एक असा भूकंप ज्याचे धक्के बीजिंगपासून न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटपर्यंत आणि भारतीय शेअर बाजारांपासून भारताच्या सिलिकॉन व्हॅली म्हणजेच बंगळूरपर्यंत जाणवत आहेत.