Premium|Agentic AI Anthropic Announcement : अँथ्रोपिकची घोषणा आणि माजलेलं काहूर

Future of Software as a Service : अँथ्रोपिकच्या नवीन टूल्समुळे सिलिकॉन व्हॅली ते दलाल स्ट्रीटपर्यंत मोठी पडझड झाली आहे. पारंपारिक आयटी मॉडेल बदलण्याची वेळ आली असून, भारतीय कंपन्यांना आता केवळ सर्व्हिस प्रोव्हायडर न राहता 'एआय ऑर्केस्ट्रेटर' बनावे लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
Agentic AI Anthropic Announcement

Agentic AI Anthropic Announcement

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर

अँथ्रोपिकची घोषणा म्हणजे तंत्रज्ञान जगातली एक ‘उत्क्रांती’ आहे. शेअर बाजारातली ही पडझड कदाचित तात्पुरती असू शकते; पण यातून मिळालेला धडा कायमस्वरूपी आहे. ज्या वेगानं एआय प्रगती करतंय, त्या वेगानं जर आपण आपलं कौशल्य अपडेट केलं नाही, तर भविष्यातली स्पर्धा कठीण असेल. भारतीय आयटी क्षेत्राकडे आजही जगातलं सर्वात मोठं टॅलेंट पूल आहे. जर या बुद्धिमत्तेनं एआयला आपला शत्रू न मानता आपला ‘सहकारी’ बनवलं, तर आपण या स्पर्धेत टिकून राहू शकू.

फेब्रुवारी २०२६च्या पहिल्या आठवड्यात जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सिलिकॉन व्हॅलीपासून दलाल स्ट्रीटपर्यंत सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ही घटना म्हणजे अमेरिकेतल्या अग्रगण्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) स्टार्टअप ‘अँथ्रोपिक’नं केलेली एक अत्यंत महत्त्वाची घोषणा. या एका घोषणेमुळे जागतिक शेअर बाजारात ‘सॉफ्टवेअर’ आणि ‘SaaS’ (Software as a Service) कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी पडझड झाली आणि त्याचा सर्वात भीषण तडाखा भारतीय आयटी क्षेत्राला बसला. अवघ्या दोन दिवसांत भारतीय आयटी कंपन्यांचे तब्बल दोन लाख कोटी रुपयांचं बाजारमूल्य मातीमोल झालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com