Premium| New Year Resolutions: नवीन वर्ष म्हणजे केवळ तारीख बदल नाही. तर आयुष्यात सकारात्मक निर्णय घेण्याची संधी उपलब्ध होते

Positive mindset: माणूस नवीन वर्षाच्या आधारावर स्वतःसाठी नवे निर्णय घेतो आणि आयुष्याला नवी दिशा देतो. सातत्य ठेवले तर हे संकल्प आयुष्य बदलू शकतात
New Year Resolutions

New Year Resolutions

esakal

Updated on

आपण नवीन वर्षाचं स्वागत खूप धूमधडाक्यात केलं. नवीन वर्षाचं स्वागत करायची पद्धत ही आपल्याकडे परंपरा बनत चालली आहे. अगदी ग्रामीण भागातही या पद्धतीचा विस्तार झालेला आहे आणि आता आपलाच सण समजून आपण प्रेमाने नवीन वर्षाशी गळाभेट करतो.

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार डिसेंबरनंतर जानेवारी येतो आणि हा येणाऱ्या नव्या वर्षाचा पहिला महिना समजला जातो. त्यानुसार १ जानेवारी हा नव्या वर्षाचा पहिला दिवस. जगात बरीच कॅलेंडर होती. काही कालवश झाली, काही वापरायला किचकट होती किंवा त्यापेक्षा इतर सोपी कॅलेंडर आली. कॅलेंडर बदलाचा खूप मोठा इतिहास आहे. परंतु आपण फक्त ग्रेगोरियन कॅलेंडरबद्दल बोलणार आहोत. जगातील जवळ जवळ सर्व देश हे कॅलेंडर वापरतात. प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडला गेला आहे. त्यामुळे सर्वांनी एक असं कॅलेंडर ‘पाळणं’ गरजेचं बनलं आहे. ती काळाची गरज बनली आहे आणि हा मान ग्रेगोरियन कॅलेंडरला मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com