
अजित चौगुले, कार्यकारी संचालक, विस्मा
सहकार क्षेत्राने शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठे योगदान दिले आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये सहकारासमोर खासगी क्षेत्राचे आव्हान असणार आहे. त्यादृष्टीने धोरणांमध्ये बदल करताना, खासगी-सहकारी भागीदारीचीही विचार होऊ शकतो.
सहकार क्षेत्राने विविध संस्थांच्या माध्यमातून विणलेल्या नेटवर्कमधून शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठे आर्थिक योगदान दिले आहे. गावपातळीवरील विविध कार्यकारी (विकास) सेवा सहकारी संस्था, तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सहकारी संस्थांनी दूध, बँकिंग, साखर, वस्त्रोद्योग, गृहनिर्माण, पतसंस्था व ग्राहक भांडार या क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे. गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना सहकारी संस्थांच्या चांगल्या कामकाजांमुळे सामान्य माणसाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोठा टप्पा गाठला आहे.