Premium|Vinayak Damodar Savarkar Bharat Ratna : सावरकरांच्या भारतरत्नावरून वाद

Demand for Bharat Ratna for Veer Savarkar and political controversy : स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' देण्याच्या मागणीवरून भाजप-काँग्रेसमध्ये जुना राजकीय वाद पुन्हा उफाळला असून, पंडित नेहरूंनी केलेला विरोध आणि सावरकरांचे अंदमानातील बलिदान या मुद्द्यांवरून देशातील राजकीय इच्छाशक्तीची आता खरी कसोटी लागली आहे.
Demand for Bharat Ratna for Veer Savarkar and political controversy

Demand for Bharat Ratna for Veer Savarkar and political controversy

esakal

Updated on

कल्याणी शंकर ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीवरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष यांच्यात नव्याने वाद सुरू झाला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दशकभरात हा निर्णय झालेला नाही. सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यावा यासाठी भाजपसह शिवसेनाही आग्रही आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रश्न अनुत्तरित आहे. भविष्यात काय होईल हे सांगणे कठीण असले, तरी जर राजकीय इच्छाशक्ती असेल तरच त्यांना ‘भारतरत्न’ दिला जाऊ शकतो.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष यांच्यात नव्याने वाद सुरू झाला आहे. सावरकरांचे विचार, त्यांची भूमिका, स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका याबाबत असलेले मतभेद या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने वर आले आहेत. सातत्याने विशिष्ट कालावधीनंतर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुढे येते आणि त्यावरून वादाचे प्रसंग निर्माण होतात, हा इतिहास आहे. सन २०१९ मध्ये महाराष्ट्र भाजपने सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस केली तेव्हा या मुद्द्यावरून मोठी राजकीय चर्चा झाली होती, यावर काँग्रेसने तीव्र टीका केली होती. सन २०२४ मध्येही ही मागणी पुन्हा पुढे आली होती. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना ‘भारतरत्न’ का देण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

Special MP-MLA Court Proceedings: Adv. Milind Pawar Interrogates Satyaki Savarkar
Usha Chati memories of Veer Savarkar
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Savarkar Defamation Case: Satyaki Savarkar Files Plea for Arrest Warrants Against Global Entities
Marathi News Esakal
www.esakal.com