
उर्मिलेश
दिल्लीच्या गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने झंझावाती यश मिळविले आहे. त्या तुलनेमध्ये या पक्षासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. भाजपकडून आम आदमी पक्षाच्या प्रतिमेवरच आघात करण्याचा प्रयत्न होत आहे, तर आम आदमी पक्षाचा मतदार काही प्रमाणात काँग्रेसकडे वळेल का, याची उत्सुकता आहे.
दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये या निवडणुकीत अनेक नवे कंगोरे दिसू लागले आहेत. यामध्ये आम आदमी पक्ष व अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेपासून त्यांच्यावरील आरोपांपर्यंत असे मुद्दे प्रचारात आहेत.