Premium|US military intervention in Venezuela 2026 : नवा 'डोन्रो सिद्धांत': अमेरिकेचा व्हेनेझुएलावर थेट प्रहार; जागतिक राजकारणात युद्धाचे नवे ढग!

Donald Trump's foreign policy analysis : अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना थेट अटक करून 'डोन्रो सिद्धांता'द्वारे लॅटिन अमेरिकेवर आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला असून, यामुळे जागतिक नियमाधारित व्यवस्थेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
US military intervention in Venezuela 2026

US military intervention in Venezuela 2026

esakal

Updated on

डॉ. मनीष दाभाडे - सहयोगी प्राध्यापक, जेएनयू

अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यातून ‘डोन्रो सिद्धांता’च्या अंमलबजावणीची सुरुवात झाल्याचा इशारा दिला आहे. मुत्सद्देगिरी, संवाद आणि नियमाधारित सहकार्य यांना दुय्यम स्थान देण्यात आले असून, शक्ती, दबाव, निर्बंध आणि थेट हस्तक्षेप यांना प्राधान्य देण्याचा हा दृष्टिकोन आहे. सार्वभौमता अबाधित राखण्याच्या मूलभूत अधिकारांवरच गदा येऊ शकते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून तीन जानेवारी रोजी व्हेनेझुएलावर झालेले अमेरिकी हवाई हल्ले एका सार्वभौम राष्ट्राविरुद्ध केलेली लष्करी कारवाई नव्हती, तर ते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक, निर्णायक आणि अस्वस्थ करणारे वळण आहे. शीतयुद्धानंतरच्या जागतिक व्यवस्थेत अमेरिकेने अनेक ठिकाणी हस्तक्षेप केला आहे, परंतु एका विद्यमान राष्ट्रप्रमुखाला थेट अटक करून देशाबाहेर नेणे, त्याचे शासन निष्प्रभ करणे आणि त्या देशाच्या भविष्यासंबंधी निर्णय घेण्याची तयारी जाहीर करणे, ही आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारणातील अभूतपूर्व घटना आहे. राजधानी कॅराकस आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक हल्ले करून अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेणे आणि अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपांखाली त्यांच्याविरोधात अमेरिकी न्यायालयात खटला चालवण्याची घोषणा करणे, हे केवळ शक्तीचे प्रदर्शन नव्हते; ते जागतिक व्यवस्थेच्या नियमांना दिलेले उघड आव्हान होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com