
माझ्या वर्गातून अनेकांना इंग्रजी जड जायचं पण मला तर मराठीसुद्धा कठीण जात होतं... आदिवासी वर्गातील भिका सांगत होता
तर कोमलच्या गावातले पोरगेसुद्धा कधी गावाबाहेर शिक्षणासाठी गेले नव्हते तिथे एका पोरीने जाणं म्हणजे लई कठीण, ती सांगत होती.
अपंग म्हणून आरक्षण मिळतं पण अपमान होतो त्याचं काय? साईनाथचा प्रश्न होता...
हे सगळे आहेत त्यांच्या कुटुंबातले शिक्षणाचे शिलेदार. यांच्याशिवाय घरातलं कुणी कधी शिकलंच नव्हतं. शाळेची पायरी तर हे सगळेजण चढले पण महाविद्यालय आणि पदव्युत्तर शिक्षणाचा गड चढताना त्यांचा चांगलाच कस लागतोय त्यात सामाजिक, आर्थिक बंधनं आहेतच... या सगळ्याचा आढावा आणि त्यांच्या शिक्षणप्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट खास सकाळ प्लसच्या वाचकांसाठी
काही प्रीव्हिलेजेस असे असतात की ते आपल्याकडे आहेत, याची जाणीवही होऊ नये, इतपत ते सवयीचे झालेले असतात. आता शिक्षणाचंच पाहा ना, तुमच्याआमच्यातल्या अनेकांच्या मुलांसाठी शिक्षण ही सहज गोष्ट असते. पण कोमल, भिका, साईनाथ, वैष्णवी यांच्यासारख्या अनेकांसाठी शिक्षणाचा हा प्रवास तितका सोपा नाही.
कुटुंबात कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक वातावरण, वारसा नसताना शिक्षण घेणारे हे शिलेदार म्हणूनच महत्त्वाचे आहेत.
शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीला कोणत्या अडचणी येतात? आर्थिक परिस्थिती, जात, धर्म, लिंग, कौटुंबिक पार्श्वभूमी यांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कसा परिणाम होतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सकाळ प्लस टीमने या लेखातून शोधण्याचा प्रयत्न केलाय.