Premium|SIR Electoral Roll Verification : ‘एस आयआर’निमित्त महाराष्ट्रात कसोटी

Election Commission of India : निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' मोहिमेचा तिसरा टप्पा एप्रिलपासून महाराष्ट्रासह २२ राज्यांत सुरू होत असून, उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील फुगलेल्या मतदारयाद्यांतून कोट्यवधी नावे वगळली जाणार का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
SIR Electoral Roll Verification

SIR Electoral Roll Verification

esakal

Updated on

सुनील चावके - ‘सकाळ’च्या दिल्ली ब्यूरोचे प्रमुख

नव्या वर्षात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्याच निकालांची पुनरावृत्ती झाल्यानंतर मतदारयाद्यांमध्ये निवडणूक आयोग पुरस्कृत बेरीज-वजाबाक्यांवरून विरोधी पक्षांचे आक्षेप थंडावले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘एसआयआर’ मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

महाराष्ट्रासह २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एप्रिल महिना सुरू होताच मतदारयाद्यांच्या सखोल पुनरावलोकनाची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मोहीम सुरू होईल. तिसऱ्या टप्प्यात सुमारे ४० कोटी मतदारांची पडताळणी होणार असून नऊ कोटी ७० लाखांसह मतदारसंख्येच्या बाबतीत भारतातील दुसरे सर्वांत मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असेल. आतापर्यंत ‘एसआयआर’पासून अलिप्त असलेल्या महाराष्ट्राच्या मतदारसंख्येची आणि काँग्रेसशासित राज्यांच्या प्रतिकाराची या निमित्ताने कसोटी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com