
निळू दामले
गाझातली लढाई तहकूब करणारा करार झाला. लढाई ४५ दिवसांसाठी थांबणार आहे. या काळात हमासनं गाझात लपवलेले इस्रायली ओलीस सोडले जातील; इस्राईलच्या कैदेत असलेले पॅलेस्टिनी सोडले जातील. येवढंच होईल. त्यानंतर गाझातली लष्करी कारवाई थांबेल की सुरुच राहील? करारात याचा उल्लेख नाही. ४६० दिवस गाझात लढाई चालली.
सुरवातीला हमासनं इस्राईलची १२०० माणसं मारली. प्रत्युत्तर म्हणून इस्राईलनं गाझातली ६० हजार माणसं मारली. हमासनं २५० ओलीस ठेवले. इस्राईलनं किती माणसं अडकवली त्याचा हिशेब कळलेला नाही.