

Goa Landscape and Music
esakal
मास्टर दीनानाथ त्यांची बहीण नगू हिचे गाणे ऐकून गुरुजींकडे निघाले, त्या वेळी निसर्गाचे रूप बदललेले होते. पावसाळी वातावरण होते. तो सारा मुग्ध करणारा कालखंड त्यांनी लतातादीदींना सांगितला होता. तो काळ दीदींनी हृदयनाथांना सांगितला, ते सारा प्रसंग सांगत आहेत, त्या वातावरणात नेत आहेत स्वतः पंडितजी...
नगूबाईचा निरोप घेऊन मी,
एक बैलगाडा सहज जाईल, एवढी रुंद
पायवाट ओलांडून डोंगर चढायला
लागलो. सहज पायाकडे पाहिले तर...
तर गोव्याची तेजोमय भगवी धूळ माझ्या
पायात उडत होती.
गोव्याची माती लालभडक नाही.
काळपट लाल, तर नाहीच नाही.
गुलाबी रंगात थोडा अधिक गडद भगवा रंग,
मिसळल्यावर प्राजक्ताच्या देठासारखा जो
सतेज भगवा रंग निर्माण होतो, तसा सतेज रंग
गोव्याच्या मातीचा आहे.