

डॉ. शैलेंद्र देवळाणकर
अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचे दीर्घकालीन परिणाम संपूर्ण जगात दिसू शकतात.
२० जानेवारी २०२५ पासून खऱ्या अर्थाने अमेरिकेत ट्रम्प यांचा कार्यकाळ सुरू झाला आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ज्या मुद्द्यांमुळे गाजली, जो मुद्दा ट्रम्प यांच्या रणनीतीमध्ये केंद्रस्थानी राहिला तो निर्वासितांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अमेरिकेत येणारे निर्वासितांचे लोंढे व त्यामुळे स्थानिकांंमध्ये निर्माण होणारी बेरोजगारी या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याला कारण ठरले आहे ते ट्रम्प यांच्याकडून झालेल्या काही नियुक्त्या आणि या नियुक्त्यांमध्ये भारतीयांचा समावेश. अलीकडेच ट्रम्प यांनी एक घोषणा करून भारतात जन्मलेल्या श्रीराम कृष्णन यांना वरिष्ठ सल्लागार म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता विभागात नियुक्त केले.