Premium|Baby Monkey Punch Japan Zoo Story : गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून..!

Animal Emotions and Loneliness : आईने नाकारलेल्या आणि कळपाने वाळीत टाकलेल्या 'पंच' या चिमुकल्या माकडाने एका निर्जीव खेळण्यात आपली 'आई' शोधली; माकडाच्या या अगतिक मिठीने जगभरातील माणसांना पुन्हा एकदा 'माणूस' म्हणून विचार करायला भाग पाडले आहे.
Baby Monkey Punch Japan Zoo Story

Baby Monkey Punch Japan Zoo Story

esakal

Updated on

सुनिष कुंजू - connectsunishskunju@gmail.com

​जपानमधील एका प्राणिसंग्रहालयातील बेबी मंकी ‘पंच’ने सध्या अवघ्या जगाला वेड लावलं आहे. आईने नाकारल्याने ते फक्त मृत्यूशी झुंज देत नव्हता; तर अथांग एकटेपणाशी संघर्ष करत होतं. त्याला ‘ओरांगुटान’ खेळण्याच्या निमित्ताने एक निर्जीव आधार मिळाला अन् त्यातच तो आपल्या आईची ऊब शोधू लागला. ‘पंच’ एक माकड आहे; पण त्याने अनेक माणसांना पुन्हा एकदा ‘माणूस’ बनवलं.

जपानमधील इचिकावा प्राणिसंग्रहालयातील तो जानेवारीचा दिवस... हवेत कमालीचा गारवा होता; पण त्या बोचऱ्या थंडीपेक्षाही जास्त गोठवणारी शांतता एका छोट्याशा पिंजऱ्यात दाटली होती. तिथे एक छोटासा जीव, ज्याचं नाव होतं ‘पंच’ जो होता एक बेबी मंकी... अर्थात चिमुकलं माकड. ‘पंच’ फक्त मृत्यूशी झुंज देत नव्हता; तर संघर्ष करत होता त्या अथांग एकटेपणाशी, जो त्याला वारशात मिळाला होता. त्याचे इवलेसे हात काहीतरी घट्ट पकडू पाहत होते; पण त्याच्या नशिबात फक्त वेदनांनी भरलेली पोकळी होती. त्याच्या मनात आईच्या उबदार स्पर्शाची स्मृती अजून ताजी होती; पण वास्तवात फक्त टोचणारी थंडी उरली होती...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com