Premium|India Mutual Fund Industry Growth 2026 : फंड मॅनेजर आणि पडद्यामागील 'कलाकार'; म्युच्युअल फंडातील अवाढव्य गुंतवणुकीचे नेमके रहस्य काय?

Mutual Fund Regulation by SEBI : भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता ८२ लाख कोटींवर पोहोचली असून, या अवाढव्य व्यवस्थेचे संचलन, गुंतवणूकदारांच्या पैशांची सुरक्षितता आणि फंड मॅनेजरची भूमिका यावर प्रकाश टाकणारा हा गुरु-शिष्यातील संवाद गुंतवणूकदारांची भीती दूर करणारा आहे.
India Mutual Fund Industry Growth 2026

India Mutual Fund Industry Growth 2026

esakal

Updated on

आज भारतातील म्युच्युअल फंड उद्योग झपाट्याने वाढत असून, त्याची एकूण मालमत्ता लाखो कोटींच्या घरात पोहोचली आहे. मात्र, या प्रचंड व्यवस्थापनामागे नेमकं कोण काम करतं, गुंतवणूकदारांच्या पैशांची सुरक्षितता कशी राखली जाते आणि पडद्यामागील कोणते ‘कलाकार’ या व्यवस्थेला चालना देतात, हे अनेकांना माहीत नसते. या संपूर्ण यंत्रणेची ओळख करून देणारा हा गुरु-शिष्यातील संवाद...

अनिकेत : नमस्कार सर...

शिक्षक : अरे, ये अनिकेत! आज काय विशेष मोहीम?

अनिकेत : सर, थोडा वेळ असेल, तर एका विषयाची माहिती घ्यायची होती तुमच्याकडून.

शिक्षक : (हसत) अरे, तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. बोल, कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या आहेत?

अनिकेत : सर, मला थोडी भीती वाटते आहे. त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. मी नुकतंच असं वाचलं, की आपल्या देशाच्या म्युच्युअल फंड व्यवसायाची एकूण मालमत्ता ८२ लाख कोटी रुपये एवढी प्रचंड आहे.

शिक्षक : (हसत) बरोबर वाचलंस तू ! पण त्यात भीती वाटण्यासारखं काय आहे?

अनिकेत : पण सर, विश्वास बसत नाही की एवढी प्रचंड रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जात असेल आणि खरं सांगतो सर, थोडी भीतीसुद्धा वाटली.

शिक्षक : तेच विचारतो आहे मी, भीती कशाची वाटली?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com