
प्रा. अविनाश कोल्हे
nashkohl@gmail.com
अलीकडे देशातल्या अनेक महानगरांत ‘हेरिटेज वॉक’ सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातल्या मुंबई, कोल्हापूर, पुण्यासारख्या शहरांत देशाचा, राज्याचा आधुनिक इतिहास घडल्याच्या खाणाखुणा अनेक ठिकाणी आढळतात. हा इतिहास केवळ राजकीय असतो, असं नाही. त्यात सांस्कृतिक घटना, व्यक्तीसुद्धा असतात. अलीकडेच मुंबईत ‘उर्दू मर्कझ’ या संस्थेतर्फे ‘कैफी आझमी वॉक’ आयोजित करण्यात आला होता. कैफी आझमी (१९१९-२००२) म्हणजे विसाव्या शतकातले पुरोगामी विचारांचे (तरक्की पसंद) कवी.
नंतर त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. शबाना आझमींचे अब्बूजान. त्यांचा जन्म १४ जानेवारीला झालेला. त्या निमित्ताने रविवार, १२ जानेवारी रोजी दुपारी मुंबईतील मदनपुरा भागात हा वॉक आयोजित करण्यात आला होता. त्यात खुद्द शबाना आझमी सहभागी झाल्या होत्या. ‘उर्दू मर्कझ लायब्ररी ॲण्ड रिसर्च सेंटर’ ही संस्था १९९९ साली मुंबईतल्या भेंडी बाजार उपनगरातील मदनपुरा या भागात स्थापन झाली. त्यामागे अॅडव्होकेट झुबेरभाई आझमी यांचे प्रयत्न होते. झुबेरभाई आजही संस्थेत कार्यरत आहेत.