

Tradition vs Modernity in Rural India
esakal
उत्तर भारतातील पारंपरिक सामाजिक रचनेत दीर्घकाळापासून प्रभावी स्थान असलेल्या खाप संस्थांनी अलीकडेच आयोजित केलेल्या ‘सर्व खाप सर्व जाती संमेलनामध्ये आधुनिक सामाजिक कायद्यांवर पुनर्विचाराची मागणी करत नवा वादंग निर्माण केला आहे. पाच राज्यांतील खाप प्रमुखांनी एकमुखाने पारित केलेल्या ठरावांमुळे ग्रामीण समाजरचनेतील मूल्यसंरक्षण आणि नव्या पिढीच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा यातील ताण पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आला आहे.
या परिषदेत मांडण्यात आलेला सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे लिव्ह-इन संबंधांना आणि LGBTQ+ समुदायाला मिळालेल्या कायदेशीर मान्यतेच्या रद्दबातलची मागणी. खाप नेत्यांच्या मते, अशा कायद्यांमुळे पारंपरिक कौटुंबिक चौकटींचा मोडल्या जात असून, ग्रामीण समाजाच्या सामाजिक-नैतिक चौकटीत दरी निर्माण होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘समाजाच्या शाश्वततेचा पाया कुटुंबव्यवस्था असून तिच्या रक्षणासाठीच हे पुनर्विलोकन आवश्यक आहे.’