Premium|Ancient Indian Costume History : दगडात विणलेली तलम वस्त्रे; मथुरा–गांधार शिल्पशैली आणि प्राचीन भारतीय वेशभूषेचा प्रवास

Kushan Dynasty Fashion : कुषाण काळातील मथुरा आणि गांधार शिल्पशैलींतून भारतीय वस्त्रपरंपरेचे अद्भूत स्थित्यंतर उलगडते, जिथे सम्राट कनिष्काच्या पुतळ्याने नेसलेल्या वस्त्रांकडून शिवलेल्या वस्त्रांकडे वळत पहिले 'राजकीय फॅशन स्टेटमेंट' मांडले असून पारदर्शक विणकामाची प्रगतीही दिसून येते.
Ancient Indian Costume History

Ancient Indian Costume History

esakal

Updated on

मथुरेत आपल्याला दिसते ती अस्सल भारतीय तलम वस्त्रे चापून-चोपून नेसण्याची परंपरा, तर गांधार शैलीत दिसतो तो रेशीम मार्गावरून आलेल्या आंतरराष्ट्रीय संस्कृतींचा प्रभाव, आणि ह्या दोन्ही शैलींना जोडणाऱ्या कनिष्काच्या पुतळ्यात दिसते ते त्या दोन्हींपेक्षाही वेगळे असे एका राज्यकर्त्याचे वस्त्रचिन्ह. पण या तिन्ही शिल्पपरंपरांना जोडणारे संस्कृतिसूत्र मात्र एकच आहे... भारतीय वस्त्रपरंपरेचे.

मागील लेखात आपण सांची आणि भारहूत येथील मौर्य आणि शुंगकालीन शिल्पांमधून दिसणारी प्राचीन भारतीय वस्त्रपरंपरेची एक झलक पाहिली. आज आपण त्याच धाग्याचा पुढचा टप्पा उलगडूया. आज आपण पाहू कुषाण काळातील मथुरा आणि गांधार या दोन समांतर, परंतु वेगळ्या शिल्पशैलींकडे. मौर्य-शुंग काळापासून ते पुढच्या कुषाण काळापर्यंतच्या तीन-चार शतकांत भारतीय वस्त्रसंस्कृतीत नेमके काय बदलले हे पाहणे फार उद्‍बोधक आहे. कालानुरूप फॅशन बदलते, हे आपण आजही पाहतो, पण ती का आणि कशी बदलते, हे आपल्याला तत्कालीन शिल्पे सांगतात म्हणून ह्या शिल्पांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com