
केदार फाळके
editor@esakal.com
श्रीशिवछत्रपती भारत भाग्यविधाता
मुघल सल्तनत, सतराव्या शतकातील भारतातील सर्वात शक्तिशाली सल्तनत, एका जटिल प्रशासकीय यंत्रणेवर आधारित होती. ही यंत्रणा सल्तनतीची स्थिरता आणि समृद्धी सुनिश्चित करीत होती. या यंत्रणेचा केंद्रबिंदू म्हणजे मनसबदारी पद्धत, जी लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची श्रेणी ठरवीत असे. मनसब म्हणजे पद किंवा दर्जा, आणि मनसबदारांना ‘जात’ आणि ‘सवार’ अशा दोन हुद्द्यांनी ओळखले जाई. ‘जात’ म्हणजे अधिकाऱ्याचा हुद्दा, तर ‘सवार’ म्हणजे त्याने सांभाळावयाचे घोडेस्वार. मनसबदारीच्या एकूण ३२ रँक होत्या. सर्वात छोटी रँक म्हणजे २० मनसब आणि सर्वांत मोठी ७ हजार. सवार रँक जात रँकपेक्षा मोठी नसे.