Premium|Study Room : आंतरराष्ट्रीय आण्विक संतुलनासाठी न्यू स्टार्ट कराराचे महत्त्व आणि आव्हाने

Nuclear disarmament agreements : जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला अमेरिका आणि रशियामधील 'न्यू स्टार्ट' अणुशस्त्र नियंत्रण करार सध्या धोक्यात असून, २०२६ पर्यंतची मुदत संपण्यापूर्वी वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nuclear disarmament agreements

Nuclear disarmament agreements

esakal

Updated on

गौरव बाळे

आंतरराष्ट्रीय सुरक्षाव्यवस्थेत आण्विक शस्त्रनियंत्रण ही जागतिक शांतता आणि स्थैर्य टिकविण्याची अत्यावश्यक अट मानली जाते. शीतयुद्ध काळात अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यातील शस्त्रस्पर्धेमुळे जगात आण्विक शस्त्रांचा प्रचंड साठा निर्माण झाला होता. १९८० च्या दशकात जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या सुमारे ६०,००० पर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. या धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध शस्त्रनियंत्रण करारांची निर्मिती झाली. त्याच प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे New START Treaty हा करार होय, जो २०१० मध्ये स्वाक्षरीत होऊन २०११ पासून अंमलात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com