
निळू दामले
मध्य आफ्रिकेतील कांगो या देशामध्ये सुमारे एक महिन्यापासून सशस्त्र गट धुमाकूळ घालत आहेत. वरकरणी हा वांशिक संघर्ष असला, तरीही त्यामध्ये कांगोतील अस्थिरता, शेजारी रवांडाची भूभागावरील नजर आणि मोठ्या देशांची दांभिकता ही कारणे आहेत. यामध्ये कांगोतील लाखो नागरिकांचा जीव जात आहे, मात्र त्याची कोणालाही फिकीर दिसत नाही.