Premium|Perito Moreno Glacier Argentina : निसर्गाचे अद्भुत रूप; अर्जेंटिनातील 'पेरिटो मोरेनो', एक जिवंत आणि सतत बदलणारी हिमनदी

Perito Moreno Glacier Movement : अर्जेंटिनातील पॅटागोनिया प्रदेशात वसलेली पेरिटो मोरेनो ही जगातील मोजक्या 'जिवंत' हिमनद्यांपैकी एक असून, तिची ३० किलोमीटर लांबी आणि सतत होणाऱ्या हालचालींमुळे ती जागतिक हवामान बदलाच्या अभ्यासासाठी आणि पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.
Perito Moreno Glacier Argentina

Perito Moreno Glacier Argentina

esakal

Updated on

उमेश झिरपे - umzirpe@gmail.com

पेरिटो मोरेनो हिमनदीचा पर्यावरणीय परिणामही महत्त्वाचा आहे. या हिमनदीतून वितळणारं पाणी लेक अर्जेंटिनोमध्ये मिसळतं आणि पुढे नदीप्रणालीत जातं. त्यामुळे स्थानिक परिसंस्था, वनस्पती आणि प्राणिजीवन यावर तिचा प्रभाव पडतो. पॅटागोनिया प्रदेशातील हवामान अत्यंत बदलतं. येथे पर्जन्यमान जास्त आहे, वारे प्रचंड आहेत आणि तापमानात सतत चढउतार होत असतात. या सर्व घटकांचा परिणाम हिमनदीच्या प्रवाहावर आणि वितळण्यावर होतो.

हिमनदी म्हणजे संथ, शांत आणि हजारो वर्षांच्या कालखंडात बदलणारी रचना, हा आपला सर्वसाधारण समज. हिमालयात किंवा आल्प्समध्ये आपण पाहिलेल्या हिमनद्यांनी ही प्रतिमा पक्की केली आहे. पण पृथ्वीवर काही हिमनद्या अशा आहेत, ज्या या सगळ्या समजुती मोडून काढतात. त्या केवळ संथ नाहीत; त्या जिवंत आहेत. त्या आवाज करतात, तुटतात, पुन्हा घडतात आणि त्यांच्या हालचाली डोळ्यांसमोर घडताना दिसतात. अर्जेंटिनातील पॅटागोनिया प्रदेशात वसलेली पेरिटो मोरेनो हिमनदी ही अशीच एक जिवंत, सतत बदलणारी आणि प्रचंड ऊर्जा असलेली हिमनदी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com