

Prahar Divyang Kranti Andolan Maharashtra
esakal
महाराष्ट्रभरातून दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात प्रहारच्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागले. हा संघर्ष एखाद्या संघटनेपुरता मर्यादित राहिला नव्हता; तर तो लाखो दिव्यांग बांधवांच्या अधिकारांचा लढा बनला होता. आंदोलनात सहभागी होणारे लोक स्वतःच्या अस्तित्वासाठी मैदानात उतरले होते.
देहू येथून सुरू झालेल्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाने महाराष्ट्रात एक मोठी जागृती निर्माण केली होती. पण, आंदोलनाचा दुसरा टप्पा हा केवळ भावनिक जागृतीचा नव्हता; हा शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडणाऱ्या संघर्षाचा टप्पा होता. आम्हाला स्पष्ट दिसत होतं, की निवेदनं देऊन आणि आश्वासनं ऐकून दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात बदल होणार नाही. म्हणून आंदोलनाला आता रस्त्यावरची ताकद, अभ्यासपूर्ण मागण्या, संघटनात्मक शिस्त आणि मंत्रालयावरचा दबाव या चार गोष्टींची जोड देणं आवश्यक होतं.
महाराष्ट्रभरातून दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात प्रहारच्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई आणि कोकण या सर्व भागांतून कार्यकर्ते उभे राहत होते. हा संघर्ष एखाद्या संघटनेपुरता मर्यादित राहिला नव्हता; तर तो लाखो दिव्यांग बांधवांच्या अधिकारांचा लढा बनला होता. शासनालाही स्पष्ट जाणवू लागलं होतं, की हा आवाज आता दुर्लक्षित करता येणार नाही. कारण आंदोलनात सहभागी होणारे लोक हे फक्त आंदोलनासाठी जमलेले नव्हते; ते स्वतःच्या अस्तित्वासाठी मैदानात उतरले होते.