
भारत राष्ट्र समितीचे(बीआरएस) प्रमुख आणि तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव (केसीआर) यांच्या पक्षासमोरील अडचणी गेल्या काही काळापासून वाढत असल्याचे दिसत आहे. याउलट रेवंत रेड्डी यांच्या सरकारसाठी मात्र अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याचेही दिसत आहे. अर्थात असे असले तरी रेड्डी यांच्या सरकारसाठी सर्व काही आलबेल आहे, असे मात्र मुळीच नाही.
मागील काही काळापासून केसीआर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केसीआर यांची मुलगी के कविता यांचे नाव दिल्लीतील मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात आले असून त्यांना या प्रकरणी काही काळ तुरुंगातही राहावे लागले आहे. आणखी एक मुद्दा सध्या बीआरएस पक्षासाठी अडचणीचा ठरत आहे.
तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर तेलंगणमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
— एमएएस कुमार