
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
तेव्हा कॉलेजवयीन मुलांमध्ये एक फॅशन होती. त्या काळच्या अमोल पालेकर, राजेश खन्ना यांसारख्या नटांचा प्रभाव होता. वरून सरळ जात पायापाशी रुंद होत जाणारी बेल बॉटम पॅन्ट आणि त्यावर खादीचा कुर्ता, दाढी वाढलेली, अस्ताव्यस्त वाढलेले केस, खांद्यावर शबनम अडकवलेली... सुरुवातीला माझीही दाढी अशी अस्ताव्यस्त वाढलेली असायची. बेल बॉटम पॅन्ट आणि माझ्या खांद्यालाही शबनम असे. नागालँडची सुंदर लाल रंगाची शबनम मला विशेष आवडायची...