Premium|Governor's veto power : महामहिमांची मनमानी

Judicial guidelines : सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी दिलेली कालमर्यादा रद्द केल्याने केंद्र-राज्य संघर्षात नवी ठिणगी पडली आहे. यामुळे राज्यांच्या कायदेनिर्मिती स्वायत्ततेवर गदा येऊन राज्यपाल पदाच्या गैरवापराची शक्यता पुन्हा वाढली आहे.
Governor's veto power

Governor's veto power

esakal

Updated on

डॉ. मोतीलाल चंदनशिवे -राज्यशास्त्राचे अभ्यासक

न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे लोकशाही कार्यपद्धतीवर प्रभाव पडतो, हे बोम्मई खटल्याची परिणामकारकता स्पष्टपणे दाखवून देते. यामुळे राज्यपाल व केंद्र सरकारच्या मनमानी वर्तनाला चाप बसला. राज्यपालांना विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय स्वायत्ततेशी सुसंगत होता. पण तो न्यायालयाने फिरवला.

तमिळनाडू विधानसभेचे बहुचर्चित विधेयक अखेर राष्ट्रपतींनी, म्हणजेच केंद्र सरकारने, मंजूर न करताच राज्य सरकारकडे परत पाठवले. हे विधेयक नामंजूर करताना केंद्र सरकारने कसलेही कारण दिले नाही. सदर विधेयकाद्वारे राज्यातील विद्यापीठांमध्ये कुलगुरूनियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला मिळणार होते. गुजरातमध्ये विद्यापीठ कुलगुरुनियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला आहेत. परंतु केंद्राने हे अधिकार तमिळनाडूसाठी मात्र नाकारले. हे विधेयक राज्यपालांनी रोखून धरल्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. त्यावर न्यायालयाने अभूतपूर्व निर्णय देऊन तितकेच अभूतपूर्व घूमजाव केले होते. न्यायालयाने आपलाच आधीचा निर्णय फिरवल्याचे परिणाम काय होतात, हे या घटनेने दाखवून दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com