Premium|Pindari Glacier Trek Uttarakhand Tourism : हिमालयाचा भव्य कॅनव्हास आणि पिंडारी हिमनदी; मुलांसाठी साहसाची पहिली पायरी कशी ठरते?

Trekking in Uttarakhand Himalayas : उत्तराखंडच्या कुमाऊँ क्षेत्रातील पिंडारी हिमनदीचे भौगोलिक महत्त्व आणि 'गिरिप्रेमी' संस्थेच्या 'आव्हाने निर्माण उड्डाण' अभ्यासक्रमांतर्गत १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांच्या साहसी हिवाळी मोहिमेचा उलगडा करणारा विशेष लेख.
Pindari Glacier Trek Uttarakhand Tourism

Pindari Glacier Trek Uttarakhand Tourism

esakal

Updated on

उमेश झिरपे - umzirpe@gmail.com

हिमनद्यांच्या या लेखमालेत आपण पुन्हा एकदा हिमालयात येऊ या. कारण हिमालय केवळ एक पर्वतरांग नाही; तो एक विस्तीर्ण कॅनव्हास आहे. या कॅनव्हासवर असंख्य हिमनद्या विणलेल्या आहेत - काही प्रचंड, काही लहान; काही प्रसिद्ध, काही अगदी शांतपणे दडलेल्या. प्रत्येक हिमनदीची स्वतःची ओळख आहे, तिचा स्वभाव वेगळा आहे आणि तिची कथा स्वतंत्र आहे. हिमालय समजून घ्यायचा असेल, तर या विविध हिमनद्यांकडे पाहणं अपरिहार्य आहे. आणि या ओळखीची सुरुवात अनेकांसाठी जिथून होते, ती म्हणजे पिंडारी हिमनदी.

उत्तराखंडच्या कुमाऊँ विभागातील पिंडारी हिमनदी ही हिमालयातील एक महत्त्वाची आणि अनुभवासाठी अत्यंत योग्य अशी हिमनदी मानली जाते. गिर्यारोहक, ट्रेकर्स, अभ्यासक आणि नव्याने हिमालयात येणारे - सर्वांसाठी ती एक पहिली पायरी ठरते. तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची सुलभता, पण त्याचवेळी तिच्यातून हिमनदीचं मूळ स्वरूपही स्पष्ट दिसतं.

गिरिप्रेमीच्या माध्यमातून चालणाऱ्या Guardian Giripremi Institute of Mountaineering (GGIM) मध्ये १० ते १६ वर्षे वयोगटासाठी आव्हान निर्माण उड्डाण (ANU) हा साहसी अभ्यासक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वर्षाच्या शेवटी हिमालयात नेऊन प्रत्यक्ष अनुभव देणं. या मोहिमेत आम्ही विद्यार्थ्यांना पिंडारी हिमनदीकडे घेऊन जातो. यामागचा उद्देश केवळ ट्रेकिंग नाही; तर हिमालय, हिमनद्या आणि निसर्गाची संवेदनशीलता यांची ओळख करून देणं हा आहे. जेव्हा एखादं मूल प्रथमच हिमनदीसमोर उभं राहतं, तेव्हा त्याच्या डोळ्यांत दिसणारा विस्मय, तोच या अभ्यासक्रमाचा खरा अर्थ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com