Premium|Study Room : ओळख नेमकी कोणाची? ट्रान्सजेंडर सुधारणा विधेयक २०२६ मुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येणार का?

LGBTQ rights India legislati : ट्रान्सजेंडर सुधारणा विधेयक २०२६ मुळे लिंग-ओळख आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावरून देशात मोठे घटनात्मक वादंग निर्माण झाले असून, वैद्यकीय पडताळणीच्या अनिवार्यतेमुळे सामाजिक संघटनांनी या विधेयकाला लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे सांगत तीव्र विरोध दर्शवला आहे.
LGBTQ rights India legislati

LGBTQ rights India legislati

esakal

Updated on

लेखक - सत्यजित हिंगे 

भारतीय लोकशाहीच्या प्रवासात सामाजिक न्याय आणि समानतेचे मूल्य हे केवळ संविधानातील शब्द नसून समाजाच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत. या पार्श्वभूमीवर अलीकडे सादर करण्यात आलेले ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयक, २०२६ हे देशात व्यापक सामाजिक, कायदेशीर आणि नैतिक चर्चेचे केंद्र बनले आहे. हे विधेयक केवळ एका समुदायाशी संबंधित नसून व्यक्तीची ओळख, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा या मूलभूत प्रश्नांना स्पर्श करते.

याविधेयकाची मुळं २०१४ मधील ऐतिहासिक NALSA विरुद्ध भारत संघ या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आढळतात. या निर्णयात ट्रान्सजेंडर व्यक्तींना “तिसरे लिंग” म्हणून मान्यता देण्यात आली आणि स्वतःची लिंग-ओळख ठरवण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा लागू करण्यात आला, ज्यामुळे या समुदायाला कायदेशीर ओळख आणि सामाजिक संरक्षण मिळाले. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com