

Separation of Powers US vs India
esakal
लेखक : अभिजित मोदे
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील महत्त्वपूर्ण निकालाने राष्ट्रपतींच्या आर्थिक अधिकारांवर नियंत्रण ठेवले असून कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील शक्ती विभाजनाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. फेब्रुवारी २०२६ च्या या निकालात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवर लादलेले टॅरिफ (आयात कर) बेकायदेशीर ठरवण्यात आले. भारत आणि अमेरिकेतील शक्ती विभाजनाची तुलना करताना दोन्ही देशांच्या घटनात्मक प्रणालीतील फरक आणि साम्यता स्पष्ट होते.