Premium|THE World University Rankings 2027: जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारताला मोठा धक्का; टॉप २५० मध्ये एकही विद्यापीठ नाही तर सगळ्या आयआयटी टॉप ५००च्या बाहेर!

India Has 143 Universities: भारत हा आशियातील सर्वाधिक विद्यापीठांचा समावेश असलेला देश ठरला असला तरी जागतिक टॉप विद्यापीठांमध्ये भारतीय संस्थांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे
THE World University Rankings 2027

THE World University Rankings 2027

esakal

Updated on: 

‘टाइम्स हायर एज्युकेशन’च्या (टीएचई) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स २०२७ मध्ये भारताची कामगिरी काही बाबतीत निराशाजनक तर काही बाबतीत आशादायी आहे. एका बाजूला या क्रमवारीत सहभागी झालेल्या भारतीय विद्यापीठांची संख्या वाढली आहे. पण दुसऱ्या बाजूला भारतातील एकाही विद्यापीठाला जगातील टॉप २५० विद्यापीठांमध्ये स्थान मिळालेले नाही. म्हणजेच भारतातील विद्यापीठांची संख्या वाढत आहे, पण जगातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान अजूनही कायम आहे.

जागतिक क्रमवारीत भारताच्या १४३ संस्थांचा समावेश

२०२७ च्या द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील १४३ विद्यापीठांचा समावेश आहे. २०२६ च्या तुलनेत ही संख्या १५ ने वाढली आहे. सलग दुसऱ्यांदा भारत हा आशियातील सर्वाधिक विद्यापीठांचा समावेश असलेला देश ठरला आहे. यंदाच्या जागतिक क्रमवारीत ११८ देशांमधील २,२९७ विद्यापीठांचा समावेश आहे.

भारतातील विद्यापीठांची संख्या वाढली असली तरी जगातील टॉप २५० मध्ये एकाही भारतीय विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. भारतातील सर्वात वरच्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच आयआयएससी, बेंगळुरू आहे. आयआयएससीला २०२७ च्या क्रमवारीत २५४ वा क्रमांक मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com