Premium|Kanchanjunga Biosphere Reserve : सिक्कीमच्या हिमनद्या

Himalayan Glacier Research : कांचनजुंगा शिखर मोहिमेतून हिमनद्यांच्या संरचनेचा आणि जलचक्राचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या या 'शांत शक्ती'वर सिक्कीमची शेती, ऊर्जा आणि जैवविविधता अवलंबून असल्याचे लेखक उमेश झिरपे यांनी स्पष्ट केले.
Himalayan Glacier Research

Himalayan Glacier Research

esakal

Updated on

उमेश झिरपे - umzirpe@gmail.com

हिमालयाचा विस्तार प्रचंड आहे. भारतासाठी प्रामुख्याने पश्चिमेकडील हिमालय आणि पूर्वेकडील हिमालय असे ढोबळ दोन भाग करता येतात. सियाचीन, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड हा पश्चिमेकडील भाग तर सिक्कीमपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतचा प्रदेश हा पूर्वेकडील हिमालय मानला जातो. हे दोन्ही भाग एका विशाल पर्वतरांगेचे घटक असले तरी त्यांचा भूगोल, हवामान आणि निसर्गस्वभाव पूर्णपणे वेगळा आहे.

पूर्व हिमालयात प्रवेश केला की सर्वप्रथम जाणवते ती ओलसर हवा. ढग अक्षरशः पर्वतांवर उतरलेले असतात, उतारांवर दाट जंगलं पसरलेली असतात आणि प्रत्येक दरीतून एखादा ओढा किंवा लहान नदी वाहताना दिसते. गढवाल किंवा हिमाचलमध्ये दिसणाऱ्या उघड्या, कोरड्या पर्वतरांगांच्या तुलनेत हा प्रदेश पूर्णपणे भिन्न भासतो. येथे बर्फ दिसण्याआधी हिरवाई दिसते; परंतु या हिरवळीच्या मागे उभी असते एक शांत, अदृश्य पण अत्यंत महत्त्वाची शक्ती-हिमनद्यांचा प्रचंड साठा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com