
अक्षय शेलार
shelar.abs@gmail.com
मोबाईल चोरीची घटना असेल किंवा मग कुणीतरी बँकेतून पैसे काढून घेण्याचे शोधलेले वेगवेगळे मार्ग असतील, या घटना आताच्या जगात प्रचंड सामान्य बनल्या आहेत. इतक्या की, पोलिसच काय, तर बहुतांश नागरिकदेखील या घटना क्षुल्लक मानून त्याकडे दुर्लक्ष करतात. आजकाल डिजिटल अरेस्ट आणि त्याच धर्तीवरील डिजिटल फ्रॉड्सविषयीच्या बातम्या सर्रास पाहायला मिळतात. आपण अशाच एका गुन्ह्याचे बळी ठरलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर एखाद्याने त्या गोष्टीचा तपास करण्याचा प्रण करणे अगदीच अशक्यप्राय कोटीतले वाटत नाही; मात्र ही व्यक्ती नव्वदीतली एक आज्जीबाई असेल तर? जॉश मार्गोलिन दिग्दर्शित ‘थेल्मा’ हीच कल्पना घेऊन साकारलेला एक चित्रपट आहे.